यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे रक्त तपासणी

सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
स्थानिक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे दिनांक 12 -12- 24 रोजी "महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आरोग्य अभियान" अंतर्गत राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियानांतर्गत इयत्ता 8 ते इयत्ता 10 व्या वर्गा पर्यंत विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्लीपूर येथील डॉ निकिता कारवटकर, गजानन नन्नवरे, सोनाली नरड व दीपा पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉक्टर निकिता कारवटकर यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल बद्दल माहिती दिली. व रक्ताचे नमुने घेण्यात आले. व तपासणी करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते
Related News
शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार – यशवंत महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन
2 days ago | Arbaz Pathan
शिक्षणाबरोबर खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक–इमरान राही”
31-Aug-2025 | Sajid Pathan